योशिहिको नोदा (जपानी: 野田 佳彦, २० मे १९५७) हे जपान देशाचे माजी पंतप्रधान व जपानी डेमोक्रॅटिक पक्षाचे प्रमुख नेते आहेत. त्यांनी २ सप्तेंबर २०११ रोजी नाओतो कान ह्यांच्याकडून पंतप्रधानपदाची सुत्रे हाती घेतली. जून २०१० मध्ये पदग्रहण केलेल्या कान ह्यांच्यावर मार्च २०११ मधील भूकंप व त्सुनामीनंतरची परिस्थिती हाताळण्यात आलेल्या अपयशाबद्दल मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. ह्याची जबाबदारी स्वीकारून कान ह्यांनी २६ ऑगस्ट २०११ रोजी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता.
डिसेंबर २०१२ मध्ये घेण्यात आलेल्या निवडणुकांमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचा दारुण पराभव झाला. विजयी पक्षाचे शिन्जो आबे हे जपानचे नवे पंतप्रधान आहेत.
योशिहिको नोदा
यामागील विज्ञान आणि इतिहास.