युएफा यूरो २००४

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

युएफा यूरो २००४ ही युएफाच्या युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेची बारावी आवृत्ती होती. पोर्तुगाल देशाने ह्या स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच आयोजन केलेल्या ह्या फुटबॉल स्पर्धेसाठी ४९ संघांच्या पात्रता फेरीनंतर सोळा संघांची अंतिम स्पर्धेत निवड केली गेली. पोर्तुगालच्या ८ शहरांमधील एकूण १० स्टेडियम ह्या स्पर्धेकरिता वापरली गेली.

स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या सामन्यात ग्रीसने यजमान पोर्तुगालला १-० असे पराभूत करून आपले पहिले व आजवरचे एकमेव युरोपियन अजिंक्यपद पटकावले. ग्रीसचा विजय हा समीक्षक व चाहत्यांसाठी अनपेक्षित होता कारण ग्रीसने ह्या स्पर्धेआधी इतर केवळ दोन मोठ्या स्पर्धांमध्ये पात्रता मिळवली होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →