यशवंतराव भोसले

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

यशवंतराव गणपतराव तथा वाय.जी. भोसले (जन्म : इ.स. १९२६. - ४ जुलै, इ.स.२०१६) हे एक मराठी चित्रपट व नाट्य सृष्टीतील दिग्दर्शक होते. त्यांच्या आयुष्यात त्यांनी ७००हून अधिक हौशी नाटकांचे दिग्दर्शन केले.

भोसले हे मास्टर विनायक यांच्या कंपनीमध्ये सहायक म्हणून रुजू झाले. बाबुराव पेंढारकर यांच्या सूचनेनुसार ते रंगभूमीकडे वळले, आणि या क्षेत्रातील सैनिक बनून त्यांनी रंगभूमीची अखंडपणे प्रदीर्घ सेवा केली. रंगभूमीच्या माध्यमातून तरुण व हौशी कलावंताचे जीवन व कलाजीवन घडविण्यामध्ये त्यांनी संपूर्ण आयुष्य खर्च केले. या व्यवसायातून पसे मिळविणे यापेक्षा चित्रपट व नाटय़ क्षेत्रासाठी नवोदित कलाकारांमधून कसदार अभिनयाचे कलावंत घडविणे याचा त्यांनी ध्यास घेतला.

वाय.जी. भोसले यांनी ‘स्वप्नगंधा थिएटर’ नावाची संस्था स्थापन करून या संस्थेतर्फे शंकर खंडू पाटील यांच्या कांदबरीवर आधारलेले ‘भल्या घरची कामिनी’ हे नाटक रंगभूमीवर आणले होते. अनेक संस्थांची नाटके रंगभूमीवर आणत असताना ते केवळ नारळ व शाल एवढेच मानधन म्हणून स्वीकारत असत.

चित्रपट व व्यावसायिक नाट्यसृष्टीला अनेक कलावंत देण्यात वाय.जी.भोसले यांचे मोठे योगदान होते. त्यांच्या दिग्दर्शनाखाली अभिनेते अरुण सरनाईक, उमा, कामिनी भाटिया, गणपत पाटील, पद्मा चव्हाण, राजशेखर, लीला गांधी, [[विलास रकटे], ‘पानिपतकार’ विश्वास पाटील, शांता तांबे, संध्या रायकर, सूर्यकांत मांडरे, आदी कलावंतांनी नाट्यकलेचे धडे घेऊन पुढे आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →