नागेश भोंसले हे एक मराठी नाट्य-चित्रपट अभिनेते आहेत. हे मुख्यत्वे खलनायकांच्या भूमिका करतात. भोंसले यांनी सुरुवातीस सत्यदेव दुबे आणि विजया मेहता यांच्याबरोबर मराठी रंगभूमी वर काम केले. चंद्रलेखा, कलावैभव अशा काही संस्थांच्या नाटकांमध्ये त्यांनी काम केले. कलावैभवच्या वन रूम किचन नाटकात त्यांना हणम्याची भूमिका वठवली. मराठी रंगभूमीबरोबरच हिंदी व इंग्लिश रंगभूमीवर आणि प्रायोगिक रंगभूमीवरही त्यांनी काम केले.
कॉटन ५६ पॉलिस्टर ४४ या मुंबईतील बंद गिरणीतल्या गिरणी कामगाराच्या जीवनावर बेतलेल्या इंग्लिश नाटकात भोसले यांनी एका गिरणी कामगाराची भूमिका केली होती. रामू रामनाथन यांनी हे नाटक लिहिले होते आणि सुनील शानभाग यांनी ते दिग्दर्शित केले होते. याच्या चेतन दातारद्वारा हिंदीमध्ये भाषांतरित नाटकातही भोसले यांनी हीच भूमिका केली. त्यानंतर भोसले यांनी चित्रपटांमध्ये आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये कामे करायला सुरुवात केली.
अजय सिन्हा यांच्या चूल आणि मूल या एका माहितीपटात नागेश भोसले यांनी मुलीच्या वडिलांची भूमिका केली. लहान वयात मुलींचे लग्न लावू नका. वयात आल्यानंतरच लावा. अशा प्रकारचा संदेश त्या माहितीपटाद्वारे देण्यात आला होता. त्यानंतर अजय सिन्हा यांनी भोसलेंना त्यांच्या हसरतें या हिंदी दूरचित्रवाहिनींवरील मालिकेत काम दिले.
नागेश भोंसले
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.