स्मिता शेवाळे (जन्म : २१ डिसेंबर १९८६, पुणे) या मराठी चित्रपट सृष्टीतील एक अभिनेत्री आहेत. त्यांनी केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केलेल्या "यंदा कर्तव्य आहे" या चित्रपटामार्फत आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली, या चित्रपटात अंकुश चौधरी हे त्यांचे सहकलाकार होते.
स्मिता शेवाळे याचं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे झाले, लहान असल्यापासुनच त्यांना कलेची आणि समाजकार्याची आवड होती, त्यांचा पहिला चित्रपट २००६ मध्ये प्रदर्शित झाला, त्यानंतर चल लव्ह कर हा त्यांचा चित्रपट २००९ मध्ये प्रदर्शित झाला, त्यानंतर त्यांचे अनेक उत्तम चित्रपट येत गेले, त्या स्वतः नृत्यांगना असल्याने अनेक दूरचित्रवाहिनी तसेच अनेक कार्यक्रमातून त्या रसिकांसमोर आपली कला सादर करत असतात. १४ फेब्रुवारी २०१३ रोजी व्हालेनटाइन डे (प्रेम दिवस) यादिवशी राहुल ओदक यांच्याशी त्यांनी विवाह केला.
स्मिता शेवाळे
या विषयावर तज्ञ बना.