बळवंत मोरेश्वर पुरंदरे

थोडक्यात पण महत्त्वाचे.

बळवंत मोरेश्वर पुरंदरे

बळवंत मोरेश्वर पुरंदरे ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे (जुलै २९, इ.स. १९२२ - १५ नोव्हेंबर २०२१) ह्यांनी आपल्या ओजस्वी वाणीने शिवचरित्र जगातील घराघरांत पोहोचविणारे, 'राजा शिवछत्रपती' या ग्रंथाचे लेखन केले, 'जाणता राजा' या महानाट्याचे लेखन-दिग्दर्शन केले. मराठी साहित्यिक, नाटककार, इतिहासकार आणि प्रसिद्ध वक्ते म्हणुन त्यांची ख्याती जगामध्ये होती.

बळवंत मोरेश्वर पुरंदरे म्हणजेच बाबासाहेब पुरंदरे यांचा २९ जुलै २०२१ रोजी १०० वा वाढदिवस झाला होता. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांच्यावर सर्वच क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांना व्हिडीओ संदेशाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव करतानाच शिवाजी महाराजांचा महाराष्ट्रावरच नव्हे, तर आख्ख्या देशावर असलेला प्रभाव बाबासाहेब पुरंदरे यांनी सांगितला अश्या शब्दात केला होता.

आदरणीय पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांचे दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मध्ये उपचार घेत असताना वृद्धापकाळाने दिनांक १५ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ५ वाजून ०७ मिनिटांनी दुःखद निधन झाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →