यशवंतराव बळवंतराव चव्हाण (मार्च १२, इ.स. १९१३:देवराष्ट्रे,सांगली महाराष्ट्र - नोव्हेंबर २५, इ.स. १९८४) हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.
त्यांनी काही काळ भारताचे उपपंतप्रधान म्हणून काम केले होते, तर काही काळ ते भारताचे संरक्षणमंत्री सुद्धा होते.
वाय.बी. चव्हाण यांचा जन्म मराठा(हेन्द्रे-पाटील) समाजात १२ मार्च, १९१३ रोजी सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे या गावी झाला.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ते ओळखले जातात. त्यांनी १ मे १९५८ रोजी धुम्या गडावर जाऊन तिथे पांडुरंगाची मूर्ती स्थापन केली व राष्ट्रसंत भगवानबाबांच्याच्या समोर धूम्या गडास भगवानगड नाव दिले. ते प्रागतिक विचारसरणीचे होते. उत्कृष्ट संसदपटू, उदारमतवादी व अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ख्याती आहे. ते रसिक व साहित्यिकही होते. “युगांतर”, “सह्याद्रीचे वारे”, “कृष्णाकाठ”, “ऋणानुबंध” ही त्यांची साहित्यसंपदा आहे.
यशवंतराव चव्हाण
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?