यश राज फिल्म्स

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

यश राज फिल्म्स ही एक भारतीय चित्रपट निर्मिती आणि वितरण कंपनी आहे ज्याची स्थापना चित्रपट निर्माते यश चोप्रा यांनी १९७० मध्ये केली होती. २०१२ पासून, त्याचे नेतृत्व त्यांचा मुलगा आदित्य चोप्रा करत आहे. कंपनी मुख्यत्वे हिंदी चित्रपटांची निर्मिती आणि वितरण करते.

२००५ मध्ये चोप्राने मुंबईत स्टुडिओ देखिल बांधला व २००६ मध्ये पहिला चित्रपट हा फना होता. तेव्हापासून, YRF स्टुडिओमध्ये अनेक उल्लेखनीय चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे, ज्यात कभी अलविदा ना कहना (२००६), दोस्ताना (२००८), वॉन्टेड (२००९), ३ इडियट्स (२००९), दबंग (२०१०), बॉडीगार्ड (२०११), रा. वन (२०११), अग्निपथ (२०१२), चेन्नई एक्सप्रेस (२०१३), आणि पी.के. (२०१४) सामिल आहे. हा स्टुडिओ सहा मजल्यांचा असून तो २० एकरात पसरलेला आहे. सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनसाठी १० का दम आणि कौन बनेगा करोडपती, तसेच क्या आप पांचवी पास से तेज हैं? , कॉफी विथ करण , आणि सत्यमेव जयते स्टार इंडियासाठी येथे चित्रीत होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →