बलदेव राज चोप्रा

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

बलदेव राज चोप्रा

बलदेव राज तथा बी.आर. चोप्रा (२२ एप्रिल, १९१४ - ५ नोव्हेंबर, २००८) हे भारतीय चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक होते. यांनी नया दौर, साधना, कानून, गुमराह, हमराझ, इन्साफ का तराझू, निकाह, इ. हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले. चोप्रा यांनी महाभारत या दूरचित्रवाणी मालिकेचे निर्माण केले.

चोप्रा यांना १९९८ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला.

त्यांचा लहान भाऊ यश चोप्रा, मुलगा रवी चोप्रा, पुतण्या आदित्य चोप्रा, पुतण्या उदय चोप्रा हे सुद्धा हिंदी चित्रपटांमध्ये कार्यरत आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →