मोनिषा सिंग साराभाई हे भारतीय मालिकेतील एक काल्पनिक पात्र आहे. साराभाई वर्सेस साराभाई या भारतीय सिटकॉम प्रकारातील मालिकेत रुपाली गांगुलीने मोनिषाची भूमिका केली. ही मालिका २००४ साली जमनादास मजेठिया आणि आतिश कपाडिया यांनी तयार केली होती. यात मुंबईतील एक उच्चवर्गीय कुटुंबाची कथा आहे.
मोनिषा एक मध्यमवर्गीय मुलगी आहे. ती दिल्लीजवळच्या नोएडातील एका पंजाबी कुटूंबातील आहे आणि आता साराभाईंची सून आहे. ती क्वचितच घराची साफसफाई करते आणि टीव्हीवर नेहमी मालिका पाहत राहते. साहिलची बायको असलेल्या मोनिषाच्या मध्यमवर्गीय सवयी माया साराभाई, तिच्या सासूला खूप त्रासदायक असतात. ज्याच्यामुळे माया उच्चवर्गीय टोमणे मोनिषाला मारत राहते. हे टोमणे कार्यक्रमात विनोद प्रचंड प्रमाणात विनोद निर्माण करत राहतात. मायाचे वाक्य "It's so middle class!" प्रचंड गाजले. आजही मायाचे हे वाक्य आणि इतर टोमणे इंटरनेट आणि समाजमाध्यमांवर नेहमी व्हायरल होत असतात. मोनिषा हे नाव लोकप्रिय होण्यामागे मायाच्या हे टोमणेच कारणीभूत आहेत.
मोनिषा साराभाई (काल्पनिक पात्र)
थोडक्यात पण महत्त्वाचे.