माया साराभाई (काल्पनिक पात्र)

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

माया साराभाई (काल्पनिक पात्र)

माया मुझुमदार साराभाई हे भारतीय मालिकेतील एक काल्पनिक पात्र आहे. साराभाई वर्सेस साराभाई या भारतीय सिटकॉम प्रकारातील मालिकेत रत्ना पाठक-शाह यांनी मायाची भूमिका केली. ही मालिका २००४ साली जमनादास मजेठिया आणि आतिश कपाडिया यांनी तयार केली होती. यात मुंबईतील एक उच्चवर्गीय कुटुंबाची कथा आहे.

मायाला मोनिषा साराभाई, तिच्या सूनेच्या मध्यमवर्गीय सवयी खूप त्रासदायक असतात. ज्याच्यामुळे माया उच्चवर्गीय टोमणे मोनिषाला मारत राहते. हे टोमणे कार्यक्रमात विनोद प्रचंड प्रमाणात विनोद निर्माण करत राहतात. मायाचे वाक्य "It's so middle class!" प्रचंड गाजले. आजही मायाचे हे वाक्य आणि इतर टोमणे इंटरनेट आणि समाजमाध्यमांवर नेहमी व्हायरल होत असतात. मोनिषा हे नाव लोकप्रिय होण्यामागे मायाच्या हे टोमणेच कारणीभूत आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →