रुपाली गांगुली ( ५ एप्रिल १९७७) ही एक भारतीय अभिनेत्री आहे जी प्रामुख्याने टीव्हीवरील तिच्या भूमिकांसाठी ओळखली जाते. चित्रपट दिग्दर्शक अनिल गांगुली यांची मुलगी असलेल्या रुपालीने तिच्या अभिनय कारकिर्दीला लहानपणीच सुरुवात केली. तिने वयाच्या सातव्या वर्षी वडिलांच्या साहेब (1985) चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. किशोरवयात तिने स्टारप्लसची मालिका संजीवनी (2002)मधील डॉ. सिमरन चोप्राच्या भूमिकेसह टीव्हीवर प्रवेश केला. या भूमिकेने तिच्या कारकिर्दीला यश मिळाले.
अतिशय लोकप्रिय सिटकॉम मालिका साराभाई वर्सेस साराभाई (2004) मधील मोनिषा साराभाईच्या भूमिकेमुळे रुपालीला खूप प्रसिद्धी मिळाली. तिने अनेक यशस्वी दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम केले. विशेषतः बा बहू और बेबी (2005), आणि परवरिश - कुछ खट्टी कुछ मीठी (2011) मधील भूमिकादेखील लोकप्रिय झाल्या.
त्यानंतर तिने अभिनयातून विश्रांती घेतली. सात वर्षांच्या विरामानंतर, गांगुली २०२० मध्ये स्टार प्लसची यशस्वी मालिका अनुपमासह परतली, ज्यात तिने प्रमुख भूमिका केली.
रुपाली गांगुली
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.