लोइस मॉरीन स्टेपलटन (२१ जून १९२५ – १३ मार्च २००६) एक अमेरिकन अभिनेत्री होती. ग्रॅमी अवॉर्डसाठी नामांकनाव्यतिरिक्त तिला अकादमी अवॉर्ड, गोल्डन ग्लोब अवॉर्ड, बाफ्टा अवॉर्ड, प्राइमटाइम एमी अवॉर्ड आणि दोन टोनी ॲवॉर्ड्ससह अनेक पुरस्कार मिळाले होते.
स्टॅपलटनचा जन्म ट्रॉय, न्यू यॉर्क येथे झाला, जॉन पी. स्टेपलटन आणि आयरीन (वॉल्श) यांची मुलगी आणि ती एका कठोर आयरिश अमेरिकन कॅथोलिक कुटुंबात वाढली. तिचे वडील मद्यपी होते आणि तिचे पालक तिच्या लहानपणी वेगळे झाले. स्टेपलटन वयाच्या १८ व्या वर्षी न्यू यॉर्क शहरात गेले आणि त्यांनी सेल्सगर्ल, हॉटेल क्लर्क, मॉडेल म्हणून काम केले व पैदे कमवले.
रेड्स (१९८१) मधील एम्मा गोल्डमनच्या भूमिकेसाठी तिच्या अभिनयासाठी त्यांनी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी अकादमी पुरस्कार जिंकला. त्यापूर्वी तिला लोन्लीहार्टस (१९५८), एअरपोर्ट (१९७०), आणि इन्टेरिअर्स (१९७८) साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी अकादमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. रेड्ससाठी, स्टेपलटनने सहाय्यक भूमिकेत सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा बाफ्टा पुरस्कारही जिंकला. एअरपोर्टसाठी तिला गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला. इतर चित्रपाटांसाठी तिला पाच गोल्डन ग्लोब पुरस्कारांचे नामांकन मिळाले होते . त्यांच्या कामात बाय बाय बर्डी (१९६३), प्लाझा सूट (१९७१), द फॅन (१९८१), कूकून (१९८५), द मनी पिट (१९८६), आणि नट्स (१९८७) या इतर उल्लेखनीय चित्रपट भूमिकांचा समावेश होता.
तिला सात एम्मी पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले आणि एक दूरचित्रवाणी चित्रपट अमंग द पाथ्स टू ईडन (१९६७) साठी तिने हा पुरस्कार जिंकला होता.
स्टेपलटनने १९४६ मध्ये द प्लेबॉय ऑफ द वेस्टर्न वर्ल्ड या नाटकातून ब्रॉडवे पदार्पण केले आणि १९५१ मध्ये द रोज टॅटू या नाटकातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा टोनी पुरस्कार तिला मिळाला. द जिंजरब्रेड लेडी या नाटकासाठी १९७१ चा टोनी पुरस्कार देखील तिला मिळाला. तिला चार अतिरिक्त टोनी पुरस्कार नामांकन मिळाले होते आणि १९८१ मध्ये अमेरिकन थिएटर हॉल ऑफ फेममध्ये तिचा समावेश करण्यात आला.
तिने अभिनयाचा तिहेरी मुकुट जिंकला. ग्रॅमी वगळता प्रत्येक प्रमुख कामगिरीचा पुरस्कार तिला मिळाला आहे. टू किल अ मॉकिंगबर्डच्या स्पोकन वर्ड रेकॉर्डिंगसाठी तिला १९७५ च्या ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.. तिला १९८१ मध्ये अमेरिकन थिएटर हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट करण्यात आले. ती ली स्ट्रासबर्ग यांच्या नेतृत्वाखाली न्यू यॉर्क शहरातील प्रसिद्ध ॲक्टर्स स्टुडिओची माजी विद्यार्थिनी होती, जिथे तिची मॅरिलिन मनरोशी मैत्री झाली, जी स्टॅपलटनपेक्षा फक्त एक वर्ष लहान होती. स्टॅपलटन आणि मनरो यांनी ॲना क्रिस्टी या नाटकात एकत्र काम केले आहे.
मॉरीन स्टेपलटन
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.