जेसिका फिलिस लॅन्गे (जन्म २० एप्रिल १९४९) एक अमेरिकन अभिनेत्री आहे. अभिनयाचा तिहेरी मुकुट मिळवणाऱ्या काही कलाकारांपैकी ती एक आहे. तिला दोन अकादमी पुरस्कार, तीन प्राइमटाइम एमी पुरस्कार, एक टोनी पुरस्कार, पाच गोल्डन ग्लोब पुरस्कार आणि एक स्क्रीन ॲक्टर्स गिल्ड पुरस्कार मिळाला आहे.
लॅन्गेने किंग काँग (१९७६) या रीमेकमधून व्यावसायिक चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटाला मिश्र प्रतिक्रिया मिळाल्या असल्या तरी तिला नवीन स्टार ऑफ द इयरचा गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला. लॅन्गेला दोन अकादमी (ऑस्कर) पुरस्कार मिळाले. कॉमेडी टुटसी (१९८२) मधील सोप ऑपेरा स्टार म्हणून सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी तिचा पहिला अकादमी पुरस्कार होता. ब्लू स्काय (१९९४) मध्ये द्विध्रुवीय गृहिणीच्या भूमिकेत सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी तिचा दुसरा ऑस्कर पुरस्कार होता. तिच्या इतर ऑस्कर-नामांकित भूमिका फ्रान्सिस (१९८२), कंट्री (१९८४), स्वीट ड्रीम्स (१९८५) आणि म्युझिक बॉक्स (१९८९) साठी होत्या. ऑल दॅट जॅझ (१९७९), द पोस्टमन ऑलवेज रिंग्ज ट्वाइस (१९८१), क्राईम्स ऑफ द हार्ट (१९८६), केप फिअर (१९९१), रॉब रॉय (१९९५), आणि बिग फिश (२००३) या तिच्या इतर प्रमुख चित्रपटातील भूमिकांचा समावेश आहे.
तिची चित्रपटातील कारकीर्द घसरायला लागल्यावर, ओ पायोनियर्स (१९९२) मध्ये काम करत लॅन्गेने दूरचित्रवाणीमध्ये कामास सुरुवात केली. त्यानंतर तिने अ स्ट्रीटकार नेम्ड डिझायर (१९९५) आणि नॉर्मल (२००३) मध्ये काम केले होते. २०१० मध्ये, एचबीओच्या ग्रे गार्डन्स मध्ये बिग एडीच्या भूमिकेसाठी लॅन्गने तिचा पहिला प्राइमटाइम एमी पुरस्कार जिंकला. त्यानंतर लँगने एफएक्सच्या हॉरर अँथॉलॉजी, अमेरिकन हॉरर स्टोरी (२०११–२०१५, २०१८) मध्ये अभिनय करून नवीन ओळख मिळवली, ज्याने तिच्या पहिल्या आणि तिसऱ्या सीझनसाठी दोन अतिरिक्त प्राइमटाइम एमी मिळवले. मिनिसिरीज फ्यूड (२०१७) मधील जोन क्रॉफर्डच्या भूमिकेसाठी तिला तिचे नववे एमी पुरस्कार नामांकन मिळाले.
२०१६ मध्ये, लॅन्गेने लाँग डेज जर्नी टू नाईटच्या ब्रॉडवे पुनरुज्जीवनाच्या नाटकासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा टोनी पुरस्कार मिळवला होता.
लॅन्गे ही छायाचित्रकार देखील आहे आणि तिने छायाचित्रांची पाच पुस्तके प्रकाशित केली आहे. ती एक युनिसेफसाठी सदिच्छा दूत पदावर आहे आणि काँगो आणि रशियात एचआयव्ही/एड्समध्ये सामाजिक सेवेत कार्यरत आहे.
जेसिका लँगे
यामागील विज्ञान आणि इतिहास.