जेसिका टँडी

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

जेसिका टँडी

जेसी ॲलिस टँडी (७ जून १९०९ - ११ सप्टेंबर १९९४) एक इंग्लिश अभिनेत्री होती. टँडी १०० हून अधिक नाटकांमध्ये दिसली आणि चित्रपट आणि टीव्हीमध्ये ६० हून अधिक भूमिका केल्या आहेत. त्यांना एक अकादमी पुरस्कार, चार टोनी पुरस्कार, एक बाफ्टा पुरस्कार, एक गोल्डन ग्लोब पुरस्कार आणि एक प्राइमटाइम एमी पुरस्कार मिळाला. तिने १९४८ मधील अ स्ट्रीटकार नेम्ड डिझायरच्या मूळ ब्रॉडवे नाटकामध्ये ब्लँचे डुबोईसची भूमिका केली होती व नाटकामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा टोनी पुरस्कार जिंकला. तसेच द जिन गेम आणि फॉक्सफायरसाठी देखील तिने हा पुरस्कार जिंकला. तिच्या चित्रपटांमध्ये अल्फ्रेड हिचकॉकचे द बर्ड्स, ककून, फ्राइड ग्रीन टोमॅटो आणि नोबडीज फूल यांचा समावेश होता. ८० व्या वर्षी, ड्रायव्हिंग मिस डेझी मधील तिच्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा अकादमी पुरस्कार प्राप्त करणारी ती सर्वात वयस्कर अभिनेत्री बनली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →