कलानिधी मारन (तमिळ:கலாநிதி மாறன) (२४ जुलै १९६४) एक भारतीय मीडिया प्रोप्रायटर आहे. ते भारतातील सर्वात मोठ्या मीडिया समूहांपैकी एक असलेल्या सन ग्रुपचे अध्यक्ष आणि संस्थापक आहेत. त्याच्याकडे अनेक दूरचित्रवाणी चॅनेल, वर्तमानपत्रे, साप्ताहिके, एफएम रेडिओ स्टेशन्स, डीटीएच सेवा, एक चित्रपट प्रॉडक्शन हाऊस (सन पिक्चर्स) आणि २ क्रिकेट संघ (इंडियन प्रीमियर लीगमधील सनरायझर्स हैदराबाद आणि सनरायझर्स इस्टर्न केप) आहेत. २०१० ते २०१५ या काळात भारतीय विमान कंपनी स्पाइसजेटमध्येही त्यांचा मोठा वाटा होता.
इंडियन प्रीमियर लीग मधील सनरायझर्स हैदराबाद आणि SA20 लीगमधील सनरायझर्स इस्टर्न केप च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-मालक असलेल्या काव्या मारन त्यांच्या कन्या आहेत.
कलानिधी मारन
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.