मे.पुं. रेगे तथा मेघश्याम पुंडलिक रेगे (२४ जानेवारी, इ.स. १९२४ - २८ डिसेंबर, इ.स. २०००) हे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. ते महाराष्ट्रातील अव्वल दर्जाचे विचारवंत आणि तत्त्वज्ञ म्हणून ख्यातकीर्त होते. मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांत त्यांनी विपुल लेखन केले. त्यांनी मराठी भाषकांना पाश्चात्य तत्त्वज्ञान परंपरेचा मुक्तपणे परिचय करून दिला. 'पाश्चात्य नीतिशास्त्राचा इतिहास', 'तत्त्वज्ञानातील समस्या' ही भाषांतरे, 'नवभारत (मासिक)' मधील त्यांचे लेख आणि विश्वकोशातील पाश्चात्य तत्त्वज्ञानविषयक व तत्त्ववेत्यांच्या नोंदी पहाता रेगे यांच्या कार्याची, त्यांच्या तत्त्वज्ञान मराठीत आणण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नाची याची खात्री पटेल. भारतीय दर्शने, ग्रीक-पाश्चात्य तत्त्वज्ञान व इतर अनुषंगिक परंपरांचा व्यासंग ही त्यांची वैशिष्ट्ये होती.
मार्च १९९६ मध्ये मुंबई महानगर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष या नात्याने मराठी भाषा – स्थिती आणि भवितव्य हया विषयावर त्यांनी भाषण केले. या भाषणात त्यांनी मराठीतील बौद्धिक परंपरेविषयी व त्या अनुषंगाने मराठी भाषा व तिच्या भवितव्याविषयी मर्मभेदक भाष्य केले आहे. ज्ञानभाषा म्हणून मराठी स्थानापन्न होण्यात नेमका कोणता अडथळा होता याची उत्तम मीमांसा त्यांच्या भाषणात आहे.
मे.पुं. रेगे हे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यानंतर मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष होते. ते 'नवभारत (मासिक)’ आणि 'न्यू क्वेस्ट’ या मासिकांचे संपादकही होते. त्याचप्रमाणे ते मराठी तत्त्वज्ञान महाकोश या प्रकल्पाच्या संपादक मंडळात होते.
मे.पुं. रेगे
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?