एम. हिरियण्णा उर्फ म्हैसूर हिरियण्णा (७ मे, इ.स. १८७१, बर्गेपल्ली, कर्नाटक - १९ सप्टेंबर, इ.स. १९५० म्हैसूर, कर्नाटक) हे स्वातंत्र्यपूर्व काळातील संस्कृतचे प्राध्यापक, भारतीय तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक आणि लेखक होते. ते दृढ अद्वैती मताचे होते. सुसंस्कृत स्वभाववाद कल्पनेचा विकास करणारे ते पहिले तत्त्ववेत्ते होते.) 'वर्तमानकाल' या भारतीय परिकल्पनेचा विशेषत्वाने अभ्यास करून पाश्चात्य तत्त्ववेत्ते आल्फ्रेड नॉर्थ व्हाईटहेड यांच्या 'वर्तमानकाल' या कल्पनेशी त्यांनी तुलना केली. भारतीय तत्त्वज्ञानातील सुखवाद सिद्धांताचाही असाच विशेष अभ्यास करून त्यात भर टाकणारे ते एकमेव अभ्यासक असावेत.)
आऊटलाईन्स ऑफ इंडियन फिलॉसॉफी आणि एसेन्शिअल्स ऑफ इंडियन फिलॉसॉफी हे त्यांचे दोन प्रमुख ग्रंथ आहेत. इंडियन फिलॉसॉफी ऑफ व्हॅल्यूज हा ग्रंथाचे प्रकाशन त्यांच्या आकस्मिक निधनामुळे होउ शकले नाही. या ग्रंथातील काही भाग त्यांच्या विद्यार्थ्यांनी आर्ट एक्सपीरियन्स, द क्वेस्ट आफ्टर परफेक्शन, इंडियन फिलॉसॉफीकल स्टडीज: भाग १ व भाग २ आणि आणि स्टडीज इन संस्कृत या शीर्षकांखाली प्रसिद्ध केले आहेत.
भारतीय तत्त्वज्ञानाचे इतिहास लेखक असणारे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, डॉ. सुरेंद्रनाथ दासगुप्ता यांचे खंड प्रकाशित झाल्यानंतर प्रोफेसर हिरियण्णा यांची पुस्तके प्रकाशित झाली. त्यांच्या पुस्तकांनी स्वतःचे असे वैशिष्ट्यपूर्ण स्थान कायम ठेवले आहे. या ग्रंथातून भारतीय दर्शनांवरील ग्रंथांचा अधिक मौलिक परिचय व मूलगामी दृष्टिही दिसून येतात, हीच त्यांच्या थोरवीची पुरेशी ग्वाही आहे. असे मत त्यांच्या ग्रंथांचे अभ्यासक जी. हनुमंत राव व्यक्त करतात.)
एम. हिरियण्णा
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.