टी.एम.पी. महादेवन

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

प्रोफेसर टी.एम.पी. महादेवन तथा तेल्लीयावारम महादेवन पोन्नबालम महादेवन (इ.स. १९११ - ५ नोव्हेंबर, इ.स. १९८३) हे तत्त्ववेत्ते होते. ते मद्रास विद्यापीठात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते आणि तेथील ॲडव्हान्स्ड स्टडी इन फिलॉसॉफीचे संचालक होते त्यांच्या पुढाकाराने तेथे १९६४ मध्ये डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन सेंटर फॉर ॲडव्हॉन्स स्टडी इन इंडियन फिलॉसॉफी हे केंद्र स्थापन करण्यात आले. त्यांनी केलेले रमण महर्षी यांच्या मी कोण? या व्याख्यानाचे तमिळमधून इंग्लिशमध्ये भाषांतर महत्त्वाचे मानले जाते. त्यांनी ग्रेस ऑफ शंकर इनकार्नेट हे आदी शंकराचार्यांचे चरित्र लिहले. अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठाच्या निमंत्रणावरून तेथे भारतीय तत्त्वज्ञानाचा आणि आध्यात्मिक परंपरबद्दलचे वर्ग घेण्यासाठी महादेवन गेले होते. तेथील वास्तव्याच्या कालावधीत त्यांनी तेथील ओलीन ग्रंथालयात भारतीय तत्त्वज्ञान विषयक आणि आध्यात्मिक विषयक पुस्तकांची मोठी दालने उभी केली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →