प्रताप तत्त्वज्ञान केंद्र हे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे तत्त्वज्ञान या विषयाचे भारतीय पातळीवरील अभ्यास केंद्र आहे. ते श्रीमंत प्रतापशेठ यांनी जुलै १९१६ मध्ये स्थापन केले. ते सध्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी जोडलेले आहे. २०१६ हे केंद्राचे शताब्दी वर्ष आहे. हे केंद्र पुणे विद्यापीठाशी जोडले गेले होते. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना १९९० च्या दशकात झाल्यानंतर ते ०७ जून १९९३ रोजी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडे सोपविण्यात आले.
शताब्दी वर्षात तत्त्वज्ञानासंदर्भात विविध उपक्रम राबविण्यासाठी अभ्यासकांची समिती स्थापन करण्याचा निर्णय उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला.
साने गुरुजी हे या केंद्राचे विद्यार्थी होते, त्यांनी येथे तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला.
प्रताप तत्त्वज्ञान केंद्र
थोडक्यात पण महत्त्वाचे.