मॅकलेन हे अमेरिकेच्या व्हर्जिनिया राज्यातील फेरफॅक्स काउंटीमधील एक वस्तीवजा शहर आहे. २०२० च्या अमेरिकेच्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ५०,७७३ इतकी होती. हे ठिकाण वॉशिंग्टन महानगर क्षेत्रांतर्गत पोटोमॅक नदी आणि व्हिएन्ना शहराच्या दरम्यान वसलेले आहे.
मॅकलेन हे वॉशिंग्टन, डी.सी., पेंटॅगॉन आणि सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सीच्या अगदी जवळ असल्याने येथे अनेक श्रीमंत नागरिक, राजनैतिक मुत्सद्दी, लष्करी अधिकारी, काँग्रेसचे सदस्य आणि उच्चपदस्थ सरकारी अधिकारी राहतात. रॉबर्ट एफ. केनेडी यांच्या पत्नी एथेल केनेडी यांचे पूर्वीचे निवासस्थान असलेल्या हिकोरी हिल येथे आहे. याशिवाय अमेरिकन क्रांतियुद्धातील अधिकारी लाइट-हॉर्स हॅरी ली यांचे पूर्वीचे निवासस्थान असलेले सॅलोना देखील येथेच आहे.
मॅकलेन (व्हर्जिनिया)
या विषयावर तज्ञ बना.