ग्लेनडेल हे अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील एक शहर आहे. प्रामुख्याने व्हेर्दुगो पर्वतांच्या पायथ्याशी असलेले हे शहर लॉस एंजेलस काउंटीच्यामध्ये लॉस एंजेलस शहराच्या उत्तरेस सुमारे १० मैल (१६ किमी) अंतरावर आहे. याचा काही भाग सान फर्नांडो व्हॅलीमध्ये मोडतो.
२०२५ मध्ये येथील लोकसंख्या अंदाजे १८७,८२३ होती.
ग्लेनडेल आणि शेजारील बरबँक आणि हॉलीवूड येथे अमेरिकन चित्रपट उद्योगाचे आणि विशेषतः अॅनिमेशनसाठीचे मोठे केन्द्र आहे. या परिसरात डिस्नेटून स्टुडियो, मार्व्हेल अॅनिमेशन आणि ड्रीमवर्क्स अॅनिमेशनची मोठी उत्पादन केन्द्रे आहेत.
हे शहर लॉस एंजेलस महानगराचा एक भाग आहे.
ग्लेनडेल (कॅलिफोर्निया)
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.