मुळशी पॅटर्न हा २०१८ सालचा प्रवीण तरडे दिग्दर्शित आणि अभिजीत भोसले, अस्सल प्रॉडक्शन आणि पुनित बालन एंटरटेनमेंट निर्मित गुन्हेगारी वर आधारित मराठी चित्रपट आहे. या चित्रपटात ओम भुतकर, मोहन जोशी, उपेंद्र लिमये यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट मुळशी, पुणे येथे घडलेल्या घटनांवर आधारित असून शेतकऱ्यांना होणारा त्रास आणि त्यांचे गुन्हेगारी जगताशी असलेले संबंध यांचे चित्रण आहे. हा चित्रपट २३ नोव्हेंबर २०१८ रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटाचा हिंदी भाषेतील रिमेक अंतिमः द फाइनल ट्रुथ हा २६ नोव्हेंबर २०२१ मध्ये प्रदर्शित झाला, या चित्रपटात सलमान खान, आयुष शर्मा, महिमा मकवाना, सचिन खेडेकर आणि उपेंद्र लिमये यांनी भूमिका साकारल्या आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मुळशी पॅटर्न
या विषयावर तज्ञ बना.