मुगाला मोड आणून केलेल्या उसळीला मुगाची उसळ म्हणतात. उसळ हा महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यात खाल्ला जाणारा पौष्टिक पदार्थ आहे. प्रथिनांचा स्रोत म्हणून उसळ या पदार्थाला आहारात स्थान देण्यात आले आहे. मटकीच्या उसळीप्रमाणेच हा पदार्थ बनवला जातो. या उसळीत मोड आलेले मूग, कांदा, टोमॅटो आणि खास घरगुती मसाले वापरले जातात. ही सुकी किंवा थोडी सरबरीत (रस्सा) करून चपाती, भाकरी किंवा पावासोबत खाल्ली जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मुगाची उसळ
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.