मुक्ताईनगर

थोडक्यात पण महत्त्वाचे.

मुक्ताईनगर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्यातील एक धार्मिक शहर आहे. मुक्ताईनगर हे मुक्ताईनगर तालुक्याचे मुख्यालय आहे.शहराच्या उत्तरेस असलेल्या तापी-पूर्णा नदीकिनारी संत ज्ञानेश्वर महाराजांची बहीण संत मुक्ताबाई यांचेे पुरातन देऊळ आहे. या देवळावरून इसवी सन २००० मध्ये शहराचे व तालुक्याचे नाव मुक्ताईनगर झाले.

मुक्ताईनगरला सर्वात जवळचे विमानतळ जळगाव येथे आहे तसेच छत्रपती संभाजीनगरचे विमानतळही जवळच आहे. मुक्ताईनगर येथे मोठे बस स्थानक व आगार आहे महाराष्ट्रात कुठेही जाण्या-येण्यासाठी इथं बससेवा उपलब्ध आहे,इथे रेल्वे स्थानक नाही. मात्र मध्य रेल्वे बोदवड रेल्वे स्थानक येथुन जवळच १५ किमी, बोदवड-मुक्ताईनगर महामार्गावर स्थित आहे.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग ५३ (पूर्वीचा क्रमांक ६) मुक्ताईनगर शहरावरून जातो. हा मार्ग मुक्ताईनगरला भुसावळ, जळगाव, धुळे, नागपूर या शहरांशी जोडतो आणि गावातून जाणारा एक राज्य-मार्ग - जामनेर, बोदवड, इच्छापुर आणि बुरहानपुरला जोडतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →