मिथुन किंवा गयाळ हा गोवंश या उपकुळातील एक सस्तन प्राणी आहे. हा एक पाळीव प्राणी असून आग्नेय आशियातील ईशान्य भारत, बांग्लादेश, म्यानमार आणि चीनच्या युन्नान प्रांत इत्यादी भागात मोठ्या प्रमाणात आढळतो.. मिथुन किंव गयाळ हा भारतातील रानगव्याचा एक वंशज असून हा नागालँड आणि अरुणाचल प्रदेशाचा राज्य पशु आहे. अरुणाचल प्रदेशातील निशि, अपातानी, गालो व अन्य इतर समाजात हा पशु प्रतिष्ठा, संपत्ती आणि विविध प्रकारच्या धार्मिक विधीसाठी वापरला जातो. याचा उपयोग शेतीकाम, दुधदुभते, चर्मोद्योग आणि मांस यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणावर केल्या जातो.
हा दिसण्यास रानगवा आणि गाय-बैल याचे मिश्रण असून या दोहोंच्या संकरातून याची निर्मिती झाली असावी असे मानले जाते. हा प्राणी रानगव्या प्रमाणे उंच, मजबूत आणि धडाधिप्पाड असून अगदी तसाच पाठीमागील बाजूस याचा आकार उतरता होत जातो. नर हा मादी पेक्षा अधिक उंच असून याची खांद्या जवळील उंची अंदाजे १५० सेंमी पर्यंत भरते. मिथुनचा रंग वयाप्रमाणे बदलत जातो. लहानपणी हा पिवळसर तांबडा असतो. जसजसे वय वाढत जाते, याचा रंग काळा किंवा काळपट तपकिरी होतो. याचे गुडघ्या खालील पाय पांढरे किंवा पिवळसर पांढरे असतात. शिंगांच्या मुळाशी याचे कपाळ सपाट असून शिंगांचा आकार मध्यम-आखूड असून वर जाऊन बाहेर वळलेले किंवा किंचित अर्धवर्तुळाकार असतात. बैलाप्रमाणे याच्या गळ्याला गळकंबळ किंवा पोळी असते, परंतु ठळक खांदा किंवा वशिंड नसते. जंगली पशु प्रमाणे याची वास घेण्याची क्षमता चांगली असते. हा जरी पाळीव प्राणी असला तरी प्राथमिक प्रशिक्षणाशिवाय याला हाताळता येत नाही. तसेच याला चरण्यासाठी मोकळे सोडले जाते.
मिथुन (प्राणी)
यामागील विज्ञान आणि इतिहास.