* सूचना: हे पान अर्धसुरक्षित आहे. फक्त प्रवेश केलेले सदस्य याच्यात बदल करू शकतात.
तांबडा पांडा म्हणजेच अस्वली मांजर हा पूर्व हिमालयाच्या नेपाळ ते अरुणाचल प्रदेश तसेच उत्तर म्यानमार आणि दक्षीण चीन या भागातील समशीतोष्ण वनात राहणारा निशाचर सस्तन प्राणी आहे. याचा पाठीकडून रंग तांबूस-तपकिरी असून खालचा रंग काळा, डोके पांढरे, शेपूट गडद तपकिरी रंगाची मोठी व जाड असते. याचे ओठ पांढुरक्या रंगाचे असतात तर गालावर दोन पांढरे पट्टे असतात. शरीराच्या मानाने याचे डोके मोठे आणि नाक टोकदार, पाय लहान, अस्वलाच्या पायांसारखे, तर याचे पंजे धारदार नखांचे असतात. तांबडा पांडा हा एकटा किंवा जोडीने राहणे पसंत करतो.
तांबडा पांडा हा उभयचर प्राणी असून बांबूचे कोंब, इतर कोवळे कंद, पक्ष्यांची अंडी, लहान प्राणी असे विविध प्रकारचे अन्न सेवन करतो. तांबडा पांडा झाडावर चढण्यात पटाईत असतो, एखाद्या उंच आणि आडव्या फांदीवर चारही पाय खाली सोडून, पोटाच्या आधाराने लटकत हा आराम करतो. या प्राण्यांचा गर्भावस्थेचा काळ सुमारे १३० दिवस असतो. मादी एकावेळी १ ते ४ पिलांना जन्म देते. तांबडा पांडाची पिले साधारणपणे एक वर्ष आईच्या सोबत राहतात.
तांबडा पांडा हा सिक्कीम राज्याचा राज्य प्राणी आहे. हा प्राणी सहज माणसाळतो. तांबडा पांडा पेक्षा वेगळा प्रचंड पांडा नावाचा आणखी एक दुर्मिळ पांडा आहे.
तांबडा पांडा
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!