राठी किंवा राठ हा शुद्ध भारतीय गोवंश असून हा मुख्यतः राजस्थान आढळतो. बहुतेक ठिकाणी राठी आणि राठ असे दोन वेगवेगळे उपप्रकार गणले जातात. हा गोवंश राजस्थान मधील बिकानेर जिल्ह्यातील राठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रांतात मोठ्या प्रमाणात आढळतो. येथील राठ नावाच्या भटक्या मुस्लिम जमाती ने याचे मोठ्या प्रमाणावर संगोपन केले आहे, त्यामुळे या गोवंशाला 'राठी' किंवा 'राठ' असे नाव पडले.
अंदाजे ७०-८० वर्षांपूर्वी राठ समाजाने थारपारकर, लाल सिंधी तथा साहिवाल आणि धन्नी या भारतीय गोवंशाचे संकर करून 'राठी' या गोवंशाची निर्मिती केली.
यातील लाल-तांबड्या रंगाच्या गोवंशाला राठी आणि पांढऱ्या रंगाच्या गोवंशाला राठ असे म्हणतात. 'राठ' हा गोवंश एकदम दुधाळ गोवंश म्हणून ओळखला जातो.
राठी गाय
यामागील विज्ञान आणि इतिहास.