भारतीय गेंडा किंवा एकशिंगी गेंडा (Rhinoceros unicornis) ही एक गेंड्याची प्रजाती आहे. गेंडा अथवा इंग्रजीत ऱ्हाईनोसेरॉस हा एक जंगली शाकाहारी प्राणी आहे. सध्या जगात गेंड्याच्या पाच प्रजाती अस्तित्वात आहेत. हा एक खुरधारी वर्गातील प्राणी असून, याचा गण अयुग्मखुरी आहे. अयुग्मखुरी म्हणजे ज्या प्राण्यांच्या पायाला विषम संख्येत खूर असतात ते प्राणी. अयुग्मखुरी गणात गेंडा हा खड्गाद्य कुळात मोडणारा एकमेव प्राणि आहे. या प्राण्याच्या पायाला तीन खुरे असतात. अयुग्मखुरी प्राण्यांना शिंगे नसतात. त्यानुसार गेंड्याचे शिंग हे खरे शिंग नसून ते एक केरोटीन नावाच्या (एक तंतुमय प्रोटीन) पदार्थापासून बनलेले आहे.
भारतात काझीरंगा येथे मोठ्या प्रमाणात भारतीय गेंडे मिळतात. एक शिंगी गेड्यासाठी काझीरंगा जगभर प्रसिद्ध आहे. जगातील २/३ भारतीय गेंडे काझीरंगा येथे आढळतात. एक शिंगी गेंडे अथवा भारतीय गेंडे भारतात आसाम, पश्चिम बंगाल व उत्तर प्रदेश या प्रांतांमध्ये आढळतात, तर काही प्रमाणात नेपाळमध्ये पण दिसतात..
भारतीय गेंडा
या विषयावर तज्ञ बना.