रानगवा किंवा गौर हा एक शाकाहारी भूचर प्राणी आहे. हा प्राणी भारत, नेपाळ, भूतान, बांग्लादेश व आग्नेय आशियाई देशांत आढळतो. केवळ दिसण्यावरून याला इंग्रजीत इंडियन बायसन असे म्हणतात. असे असले तरी बायसन आणि रानगवा हे दोन वेगवेगळ्या कुळातील जीव आहेत. भारतीय पशूंच्या मनाने रानगवा ही एक सगळ्यात उंच जंगली गाय आहे. रानगवा हे भारतात ताडोबा, निलगिरी, पश्चिम घाट, पेरियारचे जंगल, सॅलनेट व्हॅली राष्ट्रीय उद्यान, सौराष्ट्र, छत्तीसगड, ओरिसा व ईशान्य भारतीय प्रदेशांत आढळतात. हत्ती, गेंडा, पाणघोडा व जिराफ या प्राण्यांच्या खालोखाल गवा हा सर्वात वजनदार भूचर प्राणी आहे.
पूर्ण वाढ झालेला रानगवा हा रंगाने गडद काळा होतो तर मादीचा रंग तपकिरी होतो. रानगव्याच्या पिल्लांचा रंग पिवळसर असतो. सहसा रानगवे जंगलात कळप करून रहातात. रानगवा हा लाजाळू आणि निशाचर असल्यामुळे सहसा दिवसा कमीच दिसतो..
रानगवा
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.