अयुग्मखुरी किंवा विषमखुरी (इंग्रजी:Perissodactyla उर्फ odd-toed ungulate) हा एक सस्तन प्राण्यांचा गण (order) आहे. या गणातील प्राण्यांच्या प्रत्येक पायाला विषम संख्येत म्हणजे एक खुर किंवा तीन खुरे असतात. यात हयाद्य (Equidae), खड्गाद्य (Rhinoceridae) आणि तापीराद्य (Tapiridae) असे तीन कुळ अस्तित्वात आहेत.
हयाद्य मध्ये एक खुर असलेले प्राणी अर्थात घोडा, गाढव आणि झेब्रा एवढेच जीव वर्ग उरलेले आहेत, बाकी सर्व नष्ट झालेत. खड्गाद्य मध्ये तीन खुरे असलेला गेंडा हा प्राणी आहे. तर तापीराद्य मध्ये तापीर हा प्राणी मोडतो. बहुतांश तापीर च्या पुढच्या पायांना चार आणि मागच्या पायांना तीन खुरे असतात.
अयुग्मखुरी
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!