मासवडी

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

मासवडी

मासवडी हा एक महाराष्ट्रीय खाद्य पदार्थ आहे. हा ग्रामीण भागात अधिक प्रमाणात केला जातो. मासवडी चा उगम हा महाराष्ट्रातील हवेली तालुक्यात झालेला आढळतो. या तालुक्यात शिव काळापासून हा पदार्थ बनवला जातो. हा भाग शेतकरी लोकांचा असून वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेला आहे. त्यामुळे मांसाहार क्वचितच होत होता. त्यामुळे शाकाहाराला प्राधान्य देणारा भाग आहे. त्यातूनच शाकाहाराला तुल्यबळ चव, आरोग्यदायक, कमी तेलाचा वापर त्याच प्रमाणे खोबरे, तीळ, लसूण, शेगदाणे यांचा भरपूर प्रमाणात वापर मासवडीला आरोग्यदायक बनवतो. मासवडी बरोबर डाळीची आमटी ही बनविली जाते व मासवडी त्यामधे बुडवून बाजरीची, ज्वारीची भाकरी बरोबर खाल्ली जाते. जुन्नर तालुक्यात अनेक ठिकाणी हॉटेलमधे मासवडी खायला मिळते. तसेच शुभ प्रसंगी पाहुणचारासाठी या भागातले लोक मासवडीचा बेत हमखास करतात. जुन्नरच्या भागातील अनेक महिला मासवडी, आमटी, ज्वारी किंवा बाजरीची भाकरी असे जेवण बनवून कृषी पर्यटनाला आणखी आनंददायी बनवत आहेत. या तालुक्यातील काळवाडी गावातील महिला या मधे अग्रेसर आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →