पालक पनीर

या विषयातील रहस्ये उलगडा.

पालक पनीर

पालक पनीर हा पालक व पनीर वापरून केलेला पंजाबी खाद्यपदार्थ आहे.

साहित्य :



तेल

पालक १ जुडी

जिरे पूड

धणे पूड

हळद

लाल तिखट

गरम मसाला

मीठ

पनीर

कसुरी मेथी

कृती :

एक चमचा तेल तव्यामध्ये गरम करावे. लहान आकाराचे टोमॅटो बारीक करून त्यामध्ये घालावे व एक हिरवी मिरची बारीक चिरून त्यामध्ये घालावी. नंतर त्यावर झाकण घालून मंद आचेवर शिजू द्यावे. २-३ मिनिट मिश्रण मऊ होईपर्यंत मंद आचेवर ठेवावे.

पालकाची पाने स्वच्छ धुऊन बारीक कापून घ्यावी व ती कढईमध्ये टाकावी. अर्धा कप पाणी घालावे व ३-४ मिनिट मंद आचेवर शिजवून घ्यावे. थोड्या वेळाने ते थंड झाल्यावर मिक्सर मध्ये बारीक करून घ्यावे.

नंतर जिरे पूड १/२ चमचा, धणे पूड १ चमचा, हळद १/२ चमचा, लाल तिखट १ चमचा, गरम मसाला १ चमचा, मीठ चवीपुरते मिसळून घ्यावे व त्यामध्ये ४-५ चमचे पाणी मिसळून त्याचे मिश्रण बनवावे. तव्यात १ चमचा तेल घालून त्यामध्ये हे मिश्रण मंद आचेवर तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे तसेच १ चमचा जिरे घालावे, १ चमचा लसूण पूड घालावी व पालक बारीक केलेला त्यामध्ये मिसळून मंद आचेवर ठेवावे व दोन मिनिट परतून घ्यावे. नंतर त्यामध्ये चवीपुरते मीठ घालावे, २ चमचे बटर घालावे. २ चमचे साय घालावी. ते मिश्रण मंद आचेवर पारतून घ्यावे. २५० ग्रॅम पनीर घालावे व मंद आचेवर १०-१५ मिनिट ठेवावे. तुमचे पालक पनीर तयार झाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →