बिर्याणी हा प्रामुख्याने भारतीय उपखंडात बनवला जाणारा एक लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे. प्रामुख्याने भात, मसाले व मांस वापरून बनवली जात असलेल्या बिर्याणीचे मूळ मध्य युगात भारतावर राज्य करणाऱ्या मुस्लिम शासकांमध्ये आढळते. बिर्याणी हा फारसी भाषेपासून तयार झालेला एक उर्दू शब्द आहे.
मटन अथवा चिकन वापरून बनवली जात असलेली बिर्याणी भारताच्या अनेक भागात स्थानिक नावांद्वारे ओळखली जाते. उदा: हैद्राबादी बिर्याणी, अवधी बिर्याणी, दिल्ली बिर्याणी, कोलकाता बिर्याणी, मलबार बिर्याणी, इत्यादी. ह्या सर्व बिर्याण्यांमध्ये मूळ घटक सारखेच असले तरी तांदूळाचा प्रकार, मसाल्यांचे मिश्रण व पाकशैलीमध्ये वैविध्य आहे. महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी शाकाहारी बिर्याणी देखील बनवली जाते.
बिर्याणी
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.