भोकराची भाजी

थोडक्यात पण महत्त्वाचे.

भोकराची भाजी ही उन्हाळ्यात आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला मिळणारी एक अत्यंत पौष्टिक आणि औषधी रानभाजी आहे. या भाजीला काही भागांत गोंदण, चिगोर किंवा गुंदा असेही म्हणतात. भोकराची कच्चे फळे चवीला किंचित तुरट आणि आतून चिकट असतात, पण योग्य पद्धतीने बनवल्यास ही भाजी अतिशय चविष्ट आणि खमंग लागते. ही सुकी तसेच रस्सा भाजी, अशा दोन पद्धतीने बनवली जाते.

या भाजीच्या सेवनाने पोटाचे विकार दूर होतात आणि पचनक्रिया मजबूत होते. उन्हाळ्याच्या दिवसांत ही भाजी शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करते. आयुर्वेदानुसार भोकराचे फळ कफ ढिला करण्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →