माल्टा महिला क्रिकेट संघाचा सायप्रस दौरा, २०२६

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

माल्टा महिला क्रिकेट संघाचा सायप्रस दौरा, २०२६

माल्टा महिला क्रिकेट संघाचा सायप्रस दौरा, २०२६ हा जून २०२६ मध्ये झालेला महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट दौरा होता. माल्टा महिला क्रिकेट संघाने १८ ते २० जून २०२६ दरम्यान पाच महिला आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळण्यासाठी सायप्रसचा दौरा केला. सर्व सामने हॅपी व्हॅली मैदान, एपिस्कोपी येथे खेळवण्यात आले. ही मालिका २०२६ आयसीसी महिला क्रिकेट सप्ताहाच्या उपक्रमाचा भाग होती. सायप्रस आणि माल्टा यांच्यातील ही पहिली महिला टी२०आ लढत तसेच दोन्ही क्रिकेट मंडळांमधील पहिली द्विपक्षीय मालिका होती. सायप्रसने पाचही सामने जिंकून मालिका ५–० अशी जिंकली. सायप्रसची कर्णधार इरेशा चतुरानी १३१ धावांसह मालिकेतील सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली आणि तिला मालिकेतील सर्वात मौल्यवान खेळाडू म्हणून गौरवण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →