क्रोएशिया महिला क्रिकेट संघाचा माल्टा दौरा, २०२५

या विषयातील रहस्ये उलगडा.

क्रोएशिया महिला क्रिकेट संघाचा माल्टा दौरा, २०२५

क्रोएशिया महिला क्रिकेट संघाने मे २०२५ मध्ये माल्टा महिला क्रिकेट संघाविरुद्ध दोन महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यासाठी माल्टाचा दौरा केला. महिला टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये माल्टा आणि क्रोएशिया हे दोन्ही संघ प्रथमच आमनेसामने आले होते.

दौऱ्यातील सर्व सामने मार्सा स्पोर्ट्स क्लब, मार्सा येथे खेळवण्यात आले. महिला टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेपूर्वी ३ आणि ४ मे रोजी दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची टी१० मालिका खेळवण्यात आली. क्रोएशियाने ही मालिका ३–२ अशी जिंकली.

दोन सामन्यांची महिला टी२० आंतरराष्ट्रीय मालिका ५ मे २०२५ रोजी खेळवण्यात आली. माल्टाने पहिला सामना चार गडी राखून आणि दुसरा सामना आठ गडी राखून जिंकत मालिका २–० अशी जिंकली.

मालिकेत माल्टाच्या लिकिथा यादवने सर्वाधिक ६१ धावा केल्या, तर अनुपमा रमेशनने सर्वाधिक सहा बळी घेतले. क्रोएशियासाठी हेलेन लेकोने सर्वाधिक ४० धावा आणि डोरा पावेलिचने सर्वाधिक तीन बळी घेतले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →