एस्टोनिया क्रिकेट संघाचा माल्टा दौरा, २०२५

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

एस्टोनिया क्रिकेट संघाचा माल्टा दौरा, २०२५

एस्टोनिया क्रिकेट संघाने मे २०२५ मध्ये तीन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यासाठी माल्टाचा दौरा केला.

दौऱ्यातील सर्व सामने मार्सा येथील मार्सा स्पोर्ट्स क्लबवर खेळवण्यात आले. आंतरराष्ट्रीय टी२० मालिकेपूर्वी ३ आणि ४ मे २०२५ रोजी दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची टी१० मालिका खेळवण्यात आली. माल्टाने पाचही सामने जिंकून टी१० मालिका ५–० अशी जिंकली.

तीन सामन्यांची आंतरराष्ट्रीय टी२० मालिका ६ आणि ७ मे २०२५ रोजी खेळवण्यात आली. माल्टाने पहिला सामना २६ धावांनी जिंकला. एस्टोनियाने दुसरा सामना चार गडी राखून जिंकत मालिकेत बरोबरी साधली. माल्टाने तिसरा सामना १०१ धावांनी जिंकून मालिका २–१ अशी जिंकली.

मालिकेत माल्टाच्या प्रियन पुष्पराजनने सर्वाधिक १६७ धावा केल्या आणि सर्वाधिक सहा बळी घेतले. एस्टोनियाच्या स्टेफन गूचने सर्वाधिक १२५ धावा केल्या. एस्टोनियासाठी अर्सलान अमजद, स्टेफन गूच, प्राणय घीवाला आणि हबीब खान यांनी प्रत्येकी चार बळी घेतले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →