मार्गिका १० (मुंबई मेट्रो)

यामागील विज्ञान आणि इतिहास.

मार्गिका १० (मुंबई मेट्रो)

मार्गिका १० (मुंबई मेट्रो) ही हिरव्या मार्गिकेचा विस्तारित भाग असून , याला गायमुख-शिवाजी चौक (मीरा रोड) मार्गिका म्हणून संबोधले जाते. ही भारताच्या महाराष्ट्रातील मुंबई शहरातल्या मेट्रो प्रणालीचा एक भाग आहे. ही मार्गिका पूर्णपणे उन्नत आहे.

फेब्रुवारी २०१७ मध्ये, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) घोषित केले की दिली मेट्रो रेल्वे महामंडळ (डीएमआरसी) मेट्रो १०चा विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करीत आहे. एमएमआरडीए आणि डीएमआरसी यांनी संयुक्तपणे तयार केलेल्या प्राथमिक योजनेप्रमाणे ही ठाणे-भाईंदर महामार्गाला समांतर मार्गाने धावणार असून छत्रपती शिवाजी महाराज चौकात मेट्रो मार्गिका ९ शी जोडले जाईल. या प्रकल्पाची किंमत ₹३,६०० कोटी (यूएस $ ५३ कोटी) आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७ सप्टेंबर रोजी मुंबई मेट्रो १० च्या ९.२ किमी लांबीच्या गायमुख ते शिवाजी चौक (मीरा रोड) मार्गिकेचा शिलान्यास केले. २०२२ मध्ये या मार्गिकेचे काम पूर्ण होईल अशी अपेक्षा असून मीरा-भाईंदर, ठाणे, बोरीवली आणि उर्वरित मुंबईमला ही मार्गिका जोडेल. या मार्गिके मुळे रस्त्याच्या परिस्थितीनुसार सध्याच्या तुलनेत प्रवासासाठी ५०% ते ७५% पर्यंत कमी वेळ लागेल.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →