केशरी मार्गिका (उत्तर-दक्षिण) ही भारताच्या नागपुरातील नागपूर मेट्रोची जलद परिवहन प्रणाली मधील एक मार्गिका आहे. यात ऑटोमोटिव्ह चौक ते खापरी अशी एकूण १८ मेट्रो स्थानके आहेत आणि या मार्गिकेची एकूण लांबी २२.२९३ किमी आहे. बहुतेक ठिकाणी ही मार्गिका उन्नत आहे.
या मार्गिकेचा उगम कामठी मार्गावरील ऑटोमोटिव्ह चौक येथून झाला आहे; पुढे ही मार्गिका कामठी मार्गावरून अमरावती मार्ग आणि वर्धा मार्गाच्या छेदनबिंदूवर पोचते, त्यानंतर मुंजे चौकाकडे गोवारी उड्डाणपूल ओलांडून धंतोलीकडे व नाग नदीच्या बाजूने डॉ. मुंजे मार्गाकडून, पुढे काँग्रेस नगर टी-पॉईंटकडे जाते. इथून ही मार्गिका रहाटे कॉलनी मार्ग व नंतर वर्धा रोडवरून नीरीकडे जाते, नंतर वर्धा रोड व मिहान भागात रेल्वे ट्रॅकच्या पश्चिमेस जाते आणि प्रस्तावित कंटेनर डेपो जवळच्या रेल्वे हद्दीच्या रस्ता आणि चौदामीच्या दरम्यान १४ मीटर रूंदीच्या प्रदेशातून जातो.
ही मार्गिका (एकूण २२.२९३८ किमी) दक्षिणेकडील ४.६ किमी (विमानतळापासून खापरी पर्यंत) वगळता संपूर्णपणे उन्नत आहे. या मार्गिकेवर १८ स्थानके असून त्यापैकी १३ स्थानके उन्नत व ५ स्थानके भूपातळीवर आहेत. सिताबर्डी स्थानक हे एक अदलाबदल स्थानक आहे. सरासरी अंतर-स्थानक अंतर १.२ किमी आहे आणि आवश्यकतेनुसार किमान ०.५४ किमी ते २.४ किमी आहे. ही मार्गिका सिताबर्डी ते खापरी दरम्यान ७ मार्च २०१९ पासून अंशतः सुरू झाली आहे.
केशरी मार्गिका (नागपूर मेट्रो)
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?