नागपूर मेट्रो ही नागपूर शहरात उभारण्यात येत असणारी मेट्रो प्रणाली आहे. याच्या नागपूर मेट्रो टप्पा २ या मूळ नागपूर मेट्रोच्या विस्तारीत प्रकल्पालाही मंजूरी देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र सरकारने हिच्या बांधणीसाठी २९ जानेवारी २०१४ रोजी मंजूरी दिली. नागपूर मेट्रो महाराष्ट्रात मुंबई मेट्रो नंतर उभारण्यात आलेली दुसरी मेट्रो प्रणाली झाली. हा प्रकल्प सुरू होईल. या प्रकल्पाच्या बांधकामाची सुरुवात ३१ मे २०१५ रोजी झालेली आहे. भारताच्या केंद्रिय मंत्रिमंडळाची मंजूरी मिळाल्यावर व 'मेट्रो रेल्वे अधिनियम १९७८' लागू झाल्यावर २० ऑगस्ट २०१४ रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने यास मंजूरी दिली व २१ आॉगस्ट २०१४ रोजी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
या प्रकल्पावर ३० सप्टेंबर २०१७ रोजी ट्रायल रन घेण्यात आला. या प्रकल्पाचा एक भाग, म्हणजे यातील केशरी मार्गिका आधी सुरू होईल असा अंदाज आहे.
या संपूर्ण प्रकल्पापैकी रिच-१ (सिताबर्डी ते खापरी) हा तेरा किमीचा टप्पा व रिच-३ मधील लोकमान्यनगर ते सुभाषनगर हा मार्ग, व्यावसायिक वापरासाठी फेब्रुवारी २०१९ अखेरीसपर्यंत तयार होईल असा अंदाज वर्गविण्यात आला आहे. या मेट्रोमध्ये एकूण तीन डबे रहाणार असून महिलांसाठी राखीव असणाऱ्या कोचला 'नारीशक्ती' असे नाव देण्यात आलेले आहे.
नागपूर मेट्रो
थोडक्यात पण महत्त्वाचे.