माना पटेल

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

माना पटेल

माना पटेल (१८ मार्च, २००० - ) ही भारतीय जलतरणपटू आहे. ही बॅकस्ट्रोक प्रकारात पोहते.

पटेलने तोक्यो येथे २०२० उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेत १०० मीटर बॅकस्ट्रोक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले.

पटेलने ऑक्टोबर २०२१ पर्यंत ३१ राष्ट्रीय विक्रमांसह ३२ आंतरराष्ट्रीय आणि ९९ राष्ट्रीय पदके जिंकली आहेत.

पटेल सात वर्षांची असताना पोहायला सुरुवात केली. तिने अहमदाबादच्या उदगम स्कूल फॉर चिल्ड्रन येथे वाणिज्य शाखेचे शिक्षण घेतले. तिला गुजरात विद्यापीठ जलतरण केंद्रात कमलेश नाणावटी यांनी प्रशिक्षण दिले होते. ती सध्या बेंगलुरू येथील डॉल्फिन अ‍ॅक्वाटिक्स येथे प्रशिक्षक निहार अमीन यांच्या हाताखाली प्रशिक्षण घेते.

पटेल गुजरातच्या अहमदाबाद शहरात राहते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →