माधुरी कानिटकर

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर या भारतीय लष्करातील अति विशिष्ट सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक विजेत्या डॉक्टर असून २९ फेब्रुवारी २०२० या दिवशी त्यांची लेफ्टनंट जनरल या पदावर नियुक्ती झाली. या पदावर काम करणाऱ्या त्या तिसऱ्या महिला तर पहिल्या महाराष्ट्रातील महिला आहेत. त्यांनी नवी दिल्ली येथील एकात्मिक संरक्षण विभागाच्या उपप्रमुख (सीडीएस- वैद्यकीय) म्हणून पदभार स्वीकारला. त्यापूर्वी कानिटकर पुणे येथील आर्म्ड फोर्सेस मेडीकल कॉलेजच्या महिला अधिष्ठाता म्हणून कार्यरत होत्या. या पदावरील त्या पहिल्या महिला होत्या.

६ जुलै २०२१ रोजी त्यांची नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुपदी निवड झाली. लष्करातून ऑक्टोबर २०२१ मध्ये निवृत्त झाल्यावर त्या हा पदभार स्वीकारतील.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →