लेफ्टनंट जनरल मनोज पांडे (१९६२:नागपूर, महाराष्ट्र - ) हे भारतीय लष्करातील अधिकारी आहेत. हे पुण्यात असलेल्या भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख आहेत.
पांडे यांचे वडील डॉक्टर होते. त्यांचे कुटुंब नागपुरात शहरापासून दूर असलेल्या विद्यापीठ परिसरात राहायचे. तेव्हा त्या भागात शाळा नव्हती. जवळच असलेल्या वायुसेनानगरात केंद्रीय विद्यालय होते, पण तिथे बाहेरच्यांना प्रवेश नव्हता. डॉ. पांडे यांनी हवाई दलातील अधिकाऱ्यांना विनंती करून मुलगा मनोज याला या शाळेत प्रवेश मिळवून दिला. या शाळेच्या लष्करी शिस्तीत मनोज पांडे रमले व तिथूनच त्यांना सैन्यदलात जाण्याची प्रेरणा मिळाली.
अकरावी उत्तीर्ण केल्यावर मनोज पांडे केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करून पुण्याच्या नॅशनल डिफेन्स ॲकॅडमीत दाखल झाले. तेथील तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर त्यांनी डेहराडूनच्या मिलिटरी इंजिनीअरिंग कॉलेजमधून अभियांत्रिकीची पदवी मिळवली. १९८२ मध्ये ते पुण्याच्याच बॉम्बे सॅपर्स या लष्कराच्या अभियांत्रिकी सेवेत रुजू झाले.
मनोज पांडे
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.