दुर्गाशक्ती नागपाल

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

दुर्गाशक्ती नागपाल (जन्म : आग्रा, २५ जून १९८५) या भारतीय प्रशासकीय सेवेतील उत्तर प्रदेश केडरच्या अधिकारी आहेत. त्या आपल्या इमानदारीसाठी ओळखल्या जातात.

भारत सरकारच्या केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने दुर्गाशक्ती नागपाल यांची म्हणून ओएसडी-आॅफिसर आॅन स्पेशल ड्यूटी (विशेष अधिकारी) म्हणून नियुक्ती केली होती..गौतम बुद्धनगरच्या अधिकारक्षेत्रात भ्रष्टाचार आणि बेकायदेशीर वाळूच्या खाणकामांविरोधात मोठ्या प्रमाणावर मोहीम राबवली. त्यानंतर त्यांनी बेकायदा बांधकामे पाडण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे पालन करून गौतम बुद्धनगर भागातील बेकायदा भिंत पाडली. त्याबद्दल अखिलेश यादव मुख्यमंत्री असलेल्या उत्तर प्रदेश सरकारने त्यांना त्यांच्या पदावरून निलंबित केले. त्यानंतर विविध राजकीय पक्ष, भारतीय प्रशासकीय अधिकारी संघ आणि अनेक सर्वसामान्य लोकांनी ऑनलाइन सोशल मीडियावर दुर्गाशक्ती नागपाल यांचे निलंबन रद्द करावे यासाठी धोशा लावला.शेवटी २२ सप्टेंबर २०१३ रोजी उत्तर प्रदेश सरकारने त्यांचे निलंबन मागे घेतले..

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →