दुर्गा भागवत (जन्म : इंदूर, १० फेब्रुवारी १९१०; - मुंबई, ७ मे २००२) या मराठी लेखिका होत्या.
९२ वर्षांचे दीर्घायुष्य त्यांना लाभले. वैविध्यपूर्ण साहित्यप्रकारात त्यांचे मोठे योगदान आहे. यांत लोकसाहित्य, बालसाहित्य, बौद्धसाहित्य, कथा, चरित्र, ललित, संशोधनपर, समीक्षात्मक, वैचारिक लेखन यांचा समावेश होतो. त्यांना फ्रेंच, जर्मन, इंग्रजी, संस्कृत, पाली या भाषा चांगल्या अवगत होत्या. त्यांचे संस्कृत, पाली आणि इंग्लिश भाषेमध्येही लेखन आहे.
१९७५ साली इंदिरा गांधींनी देशावर लादलेल्या आणीबाणीला स्पष्ट विरोध करणाऱ्या म्हणून दुर्गाबाई विशेष मान्यता पावलेल्या आहेत.
दुर्गा भागवत
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.