जयंत पवार

या विषयातील रहस्ये उलगडा.

जयंत पवार

जयंत पवार (२२ फेब्रुवारी, १९६० - २९ ऑगस्ट, २०२१:मुंबई, महाराष्ट्र) हे एक मराठी साहित्यिक होते. त्यांनी नाट्यसमीक्षा, एकांकिका, नाटक, कथा, वैचारिक व ललित लेख अशा अनेक प्रकारातील लेखन केले. याशिवाय चित्रपटांचे पटकथा व संवादही लिहिले. त्यांनी महानगर, चंदेरी साप्ताहिक, लोकसत्ता दैनिकात होते व नंतर अनेक वर्षे महाराष्ट्र टाइम्समध्ये पत्रकारित्व केले.

अधांतर हे यांचे पहिले प्रसिद्ध नाटक होते. याचा पहिला प्रयोग ८ ऑगस्ट १९९७ला झाला . नाटकास अनेक मानाचे पुरस्कार मिळाले. २०१०मध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या पहिल्याच कथासंग्रह फिनिक्सच्या राखेतून उठला मोरला २०१२मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →