वजीर-उद्-दौला रावबहादुर सरदार माधवराव विनायकराव किबे (४ एप्रिल १८७७:इंदूर - १२ ऑक्टोबर १९६३:इंदूर), एम.ए., एम.आर.ए.एस., एफ.आर.एस.ए. हे एक अर्थतज्ज्ञ आणि हिंदुस्थानच्या प्राचीन इतिहासामध्ये संशोधन करणारे विद्वान होते. त्यांना ग्रंथवाचनाची आणि आपले विचार लिहून काढण्याची मनापासून आवड होती. माधवराव विनायकराव किबे हे एक चांगले मराठी साहित्यिक होते. मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी त्यांनी अनेक मार्गदर्शनपर लेख लिहिले. इंदूर संस्थानात मराठी भाषा जिवंत ठेवण्याचे बहुमोल कार्य त्यांनी केले. इंदूरमधील सामाजिक आणि साहित्य चळवळीत त्यांचा पुढाकार असे.
मूळचे कोकणातल्या संगमेश्वर येथे राहणारे किबे यांचे पूर्वज उत्तर पेशवाईत होळकरांच्या इंदूर संस्थानात स्थलांतरित झाले व तेथे होळकरांच्या संस्थानात अधिकारी म्हणून रुजू झाले. तिथेच या घराण्याला सरदार हा किताब मिळाला.
माधवराव विनायकराव किबे
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.