रावबहादुर सरदार माधव विनायक किबे यांच्या पत्नी कमलाबाई किबे या कोल्हापूरच्या इतिहासप्रसिद्ध सरदेसाई घराण्यातल्या. हे घराणे पुढे रत्नागिरीला जाऊन उद्योगधंद्यांत भरभराटीला आले.
कमलाबाई किबे एक मराठी कवयित्री, कथालेखक आणि सामाजिक विषयावर लेखन करणाऱ्या लेखिका होत्या. आकर्षक, ओजस्वी आणि प्रभावशाली वक्तृत्वासाठी त्यांच्या काळात त्या प्रसिद्ध होत्या. त्यांना साहित्यिक आणि सामाजिक कार्यात मोठा रस होता. भारतात आलेल्या लॉर्ड मॉन्टेग्यू आणि लॉर्ड चेम्सफोर्ड यांना मद्रासला जाऊन भेटणाऱ्या शिष्टमंडळावर हिंदुस्थानातील महिलांच्या प्रतिनिधी म्हणून कमलाबाई निवडल्या गेल्या होता. कमलाबाई किबे या अखिल हिंदुस्थानीय महिला शिक्षण संघटनेच्या सदस्य होत्या. त्यांच्या पतीबरोबरच त्या हिंदुस्थान सरकारच्या इंडियन हिस्टॉरिकल रेकॉर्ड्स कमिशनच्या दूरस्थ सदस्य होत्या.
कमलाबाई किबे १९१७मध्ये इंदूरमध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात व्यासपीठावर होत्या. त्यांचे तिथे भाषणही झाले होते. त्या भाषणाशिवाय कमलाबाईंनी संमेलनाच्या तिसऱ्या दिवशी त्यांचा एक निबंध वाचून दाखविला. त्यानंतरच्या भाषणात, ’ज्ञानवृद्धीकरिता वाचन हे प्रमुख साधन असल्याने, मुलांत वाचनाची अभिरुची वाढविण्यासाठी मोठ्यांनी मुलांच्या आवडीचे साहित्य लिहून मायभाषेची सेवा करावी’ असे त्या म्हणाल्या.
कमलाबाई किबे
यामागील विज्ञान आणि इतिहास.