नरहर रघुनाथ फाटक (जन्म : जांभळी(भोर संस्थान), एप्रिल १५, १८९३ - - मुंबई, डिसेंबर २१, १९७९) हे मराठी प्राध्यापक, प्रकांड पंडित, पत्रकार, चरित्रलेखक, इतिहाससंशोधक, मराठी संत वाङ्मयाचे चिकित्सक व साहित्यसमीक्षक होते. न.र. फाटके हे १९३७ साली विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. हैदराबाद येथे १९४७ साली भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचेही ते अध्यक्ष होते.
फाटक स्वतंत्र प्रज्ञेचे समीक्षक होते तसेच प्रचलित विचारप्रवाहाविरुद्ध मतप्रदर्शन करून वाद निर्माण करणे हे त्यांच्या वृत्तपत्रीय लेखनाचे वैशिष्ट्य होते.
नरहर रघुनाथ फाटक
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.